आजच्या बोध-स्पर्शिका
प्रपंच
प्रपंचा पासुन पळणाऱ्यांचा
संपत नसतो प्रपंच-हुरूप
बर्फात राहिल्याने, होत नाही
कुणी फायर-प्रुफ
.............................
गीता
शब्दांच्या पलीकडले दिसायला लागले की
वाचावी
गरज फक्त ‘धार्मिक’ असेल तर
घोकावी
...............................
बिन –सायास
अंधार उलगण्यासच
लागे प्रयास
प्रकाश दिसतो
बिन सायास
.............................................. अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home