Wednesday, August 17, 2011

स्वतःतच परतणे

जसें फक्त जा ऐकले की

लगेच प्रश्न पडतो कुठे जायचे?

कुठे ची कल्पना असल्या शिवाय

जाणे साधता येत नाही

जा- असे ऐकल्यावर

ऐकणारा कुठे च्या

शोधात बाहेर बघायला लागतो,

तपास सुरु करतो आणि

शेवटी दुसऱ्या च्या सांगण्या प्रमाणे

किंवा स्वतःशीच ठरवून

एखाद्या दिशा, जागा, किवा वस्तू कडे

चालायला लागतो

एखादा असा ही असतो

जो आहे तिथेच थांबून जाणे घडवतो

...........

जो कुठे चा शोध बाहेर घेतो

तो आपली जागा सोडून

दुसऱ्या जागी जाऊ बघतो

जो आहे त्या जागीच कुठे शोधतो

तो स्वतःतच परत जातो

............................................. अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home