Wednesday, August 24, 2011

आजच्या बोध-स्पर्शिका

बुद्धां चे शब्द

बुद्धां चे शब्द सरळ सरळ भेटले

तर भावतात

कोल्ड-स्टोरेज मधुन आले

तर बाधतात

.............................

आशय डोक्यात

शब्द दिसताच

जो आशय जागतो

शब्दात नसतो पण

डोक्याला गावतो

...............................

ज्ञाना ची दाट वस्ती

जर डोक्यात ज्ञाना ची

वस्ती दाट झाली

समज-उमज यांना

न जागा उराली

.............................................. अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home