Monday, August 22, 2011

आजच्या बोध-स्पर्शिका

फक्त असणे

जग आहे

फक्त असणे

बुद्धि चे काम

मोजत बसणे

..............................

सारासार दृष्टी

मिसळून राहते

खोटे अन् खरे

खोटे कोणते अन् खरे काय

जाणून घेणे बरे

...............................

प्रशांत

सागर शांत

लाट अशांत

दोघांत जो एकत्व बघी

तो प्रशांत

............................................... अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home