प्रकाशाचा शोध
प्रकाश तर आहे नेहमीच,
आडोसा झाला तरच अंधार,
परंतु आडोसा पांघरूनच जे राहतात
ते घेत राहतात आयुष्यभर
प्रकाशाचा शोध
एखाद्या देवळात, एखाद्या मंत्रात,
एखाद्या आराधनेत तर एखाद्या
गुरुच्या पावलांशी
.................................... अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home