Saturday, September 17, 2011

आजच्या बोध-स्पर्शिका

करुणा

अर्जुनाची करुणाच करुण

कृष्ण त्यास शुद्ध देतो

सिद्धार्थ भरला करुणेनं

आपसुकच तो बुद्ध होतो

.............................

प्रेम म्हणजे अनन्यभाव

मैत्री, आप्तभाव आणि सहानुभूती

म्हणजे प्रेम नाही

प्रेम म्हणजे अनन्यभाव

स्वार्थाचा जिथे लवलेश नाही

...............................

जीवनरेष

बिंदु बिंदु जोडल्याने

रेषा दिसून येते

क्षणिक प्राण-बिंदुं ची

जीवन-रेष होते

.............................................. अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home