आजच्या बोध-स्पर्शिका
अहंकारा ची विहीर
आकाशा चे पंख घेऊन,
जो सागरा वरून उडतो तो
कसा साधणार संवाद तयाशी
जो विहिरीतच रमतो
.............................
पाटी
मोठ्यां चे ज्ञान, पाटीवर
छोट्यांच्या आले
छोट्यांना वाटे, स्वतः
हे त्यानीच मिळवले
...............................
गुरु
ज्याचे बोट धरून चालतो
तो आपला वाटसरू
ज्याच्या प्रकाशात चालतो
तोच फक्त आपला गुरु
.............................................. अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home