आजच्या बोध-स्पर्शिका
देव निर्हेतुक
सूर्य उगवतो, पाऊस पडतो
नसता कांही प्रयोजन
हा फक्त माणूसच, ज्याला
ध्येय, हेतु, धोरण
.............................
अवधान
जागे चे भान असे
कधी काळाचे भान
मीच सकल ब्रह्मांड
क्वचितच हे अवधान
...............................
वरवर ची भक्ती
प्रवचन ऐकताना
प्रवचनात नसतो
प्रपंच करताना
ओव्या घोकीत बसतो
.............................................. अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home