Saturday, September 3, 2011

आजच्या बोध-स्पर्शिका

बुद्धी आणि बुद्ध

बुद्धी करते तुकडे तीन

सूर्य चंद्र तारे

बुद्धां च्या नजरेत

एकच आकाश त्यातच सारे

.............................

भेद

भेद जन्मला की

तू आणि मी आलेच

नदी म्हटली की

दोन किनारे झालेच

...............................

सुख दुःख एकच

दुःखाला लागते

सुखा ची तहान

किती ही मोठें असो

सुख नेहमीच लहान

.............................................. अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home