आजच्या बोध-स्पर्शिका
विज्ञान-प्रज्ञान
कारण-शृंखले चे तथ्य-ज्ञान
असते विज्ञान
परम-कारणाचे तत्व-ज्ञान
आहे प्रज्ञान
.............................
वेगळेपण
आई ने दिला जन्म
समाजाने वेगळेपण
‘माझे-तुझे’- हाच संवाद
चालत राहे आमरण
...............................
उभ्या-आडव्या रेघा
शब्द म्हणजे
उभ्या-आडव्या रेघांचे हांतरुण
अर्थ म्हणजे
मायेचे घातलेले पांघरूण
.............................................. अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home