Thursday, September 1, 2011

गणेशा जवळ प्रार्थना


रे गणेशा दे दिशा, अज्ञान सरू दे

भाव मनी विश्वात्मकी मंगल घडू दे

१)मागताना मन पुरे

निर्मल असू दे

लोभ भयं अन् वासनेचे

कण नसू दे

हे कसे होइल याची

बुद्धि दे

रे गणेशा .............

२) दुःख माझे सुख निश्चित

हे कुणाचे

सुख माझे दुःख कुणीया

बांधवाचे

म्हणुनी म्हणतो तू मनाला

जाग दे

रे गणेशा .............

३) हात जोडूनी उभा मी

सांगण्याला

तूच माझ्या चित्ती ये

राहावयाला

मग मला कांही नको

चितामणी दे

रे गणेशा .............

४) मी तुझी रेखाटली

चित्रे किती रे

मी कसा दिसतो मला

कळलेच नाही

आरसा हो मूर्ती मज माझी

दिसू दे

रे गणेशा .............

रे गणेशा दे दिशा, अज्ञान सरू दे

भाव मनी विश्वात्मकी मंगल घडू दे

......................................................... अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home