आजच्या बोध-स्पर्शिका
शब्द
शांतता अशांत आहे
शब्दांच्या गोंगाटात
शब्द प्रशांत आहे
शांती च्या सहवासात
.............................
निर्माल्य
नदी च्या प्रवाहात
वाहणे सहज सरल
निर्माल्यालाच
जीवन कळल
...............................
जुने –नवीन
जुन्याचे नवीन करणे
नाही कठीण
विसरता पूरे चे पूरे जुने,
घडते नवीन
.............................................. अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home