Wednesday, September 14, 2011

आजच्या बोध-स्पर्शिका

मना च्या आंत

चाकावर बसुन प्रवास होतो

झकास

चाका आंत जो बसला त्याला

त्रासाच त्रास

.............................

कर्म आणि फळ

कर्म केले

तरच फळ गवसते

केल्यावर ते गवसेलच

याची खात्री नसते

...............................

मन-तरंग

खडा पडताच मन-जलात

जलात उठतात तरंग

जेंव्हा मना चे आकाश होते

किती ही छेडा, राहते अभंग

.............................................. अरुण

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home