आजच्या बोध-स्पर्शिका
आत्मज्ञान
कांहीतरी पेटवा अन्
अंधार मिटवा
दिव्य-प्रकाश हवा तर
अंधारच पेटवा
.............................
मुक्ती
भिंतीवर आदळल्या शिवाय
दार कुठे उमजत नाही
भिंतीलाच जे पूजत बसतात
त्यांना दार दिसत नाही
...............................
मूळ कारण
वर वर ची कारणे मिटवून
होत नाही सुटका
मुळापर्यंत पोहचताच
ज्ञानाचा झटका
.............................................. अरुण

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home