Saturday, December 10, 2011

अस्तित्वाचा हेतु

माहीत नाही मज

जगण्याचा हेतु

पूर्ण होवू देतो मी माझ्यात

अस्तित्वाचा हेतु

................................ अरुण

Thursday, December 1, 2011

शांतपणे विसावत आहे

कुऱ्हाड घेऊन हातात
झाडा कडे धावलो
अन् आता त्याच झाडाच्या गर्द सावलीत
मी आणि माझी कुऱ्हाड
शांतपणे विसावत आहे
……………….. अरुण