Monday, October 17, 2011

बोध स्पर्शिका

आरसा

आरशात प्रतिमा हसतात किंवा

राहतात शांत

आरशा पुढे कोणी असो किंवा नसो

आरसा नेहमीच प्रशांत

.....................

बोलपट बोलतोय

कागदी चेहऱ्या मागून आवाज आला

की वाटत चेहराच बोलतोय

देहा मागून देह नव्हे

मनातला बोलपट बोलतोय

..........................

एकत्व

जरी लाटे चे सागरात

वेगळेपण दिसते

पण सागर अन् अस्तित्वा चे एकत्व

कायम असते

................................................ अरुण

Sunday, October 16, 2011

बोध स्पर्शिका

मूर्ख दोन प्रकरचे

शहाणपणाचा अभाव असणारा

मूर्खच

शहाणपणाचा भाव मिरवणारा ही

मूर्खच

.....................

मनातच प्रवास

श्वास श्वास जगतो, त्यास

न आस न इतिहास

श्वासांचा विसर पडलेला करतो

फक्त मनातच प्रवास

..........................

मनुष्यच परावलंबी

सर्व प्राण्यांत मनुष्यच

परावलंबी

म्हणून बुद्धी ची लागे गरज

होण्या स्वावलंबी

................................................ अरुण

Saturday, October 15, 2011

बोध-स्पर्शिका

अर्थ

जसा लावावा तसाच

अर्थ लागतो

कारण शब्दात

अर्थ नसतोच

...........................

जाग

झोपेने केले कितीही प्रयत्न

तरी जाग येत नाही

जाग असते कशी?,

हे झोपेला माहीतच नाही

................................

माझेपण

प्रत्येकाचे माझेपण

काल्पनिक असते

कल्पना वितळली की

माझेपण विझते

........................................ अरुण

Thursday, October 13, 2011

बोध-स्पर्शिका

व्यक्ति आणि व्यक्तिमत्व

कोणती भाषा लिहिणे यावर

कागदा चा पोत ठरत नसतो

व्यक्तिमत्व कसे ही असो

व्यक्ति मात्र एकच असतो

.............................

तहानल्यां चे गोत

तहान केवळ माझीच

ओलावतो माझेच ओठ

जर असती सामुहिक तर

असते तहानल्यांचे गोत

...............................

सूर्य-मंदिर खास

हे खुले आकाश

लख्ख सूर्य प्रकाश

त्या खाली बनवले माझे

सूर्य मंदिर खास

.............................................. अरुण